STORYMIRROR

Aarti Shirodkar

Romance Classics

4  

Aarti Shirodkar

Romance Classics

मी अनुभवलेला पाऊस - भाग दोन

मी अनुभवलेला पाऊस - भाग दोन

1 min
418

आतुरता त्याचीच असताना,

मुक्त तो बरसला, 

आलिंगन देऊन गेला,

आसुसलेल्या वसुधेला ॥


आज पुन्हा निळाई,

आकाशात रंग घेई,

दंवबिंदू पानांवरती,

मोती बनून राही ॥


दंवबिंदू हे टिपताना,

चाहूल तुझी नसताना,

मनात मागणे एक,

तू साद धरणीची ऐक॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance