मायलेक
मायलेक
1 min
235
तू मला आयुष्य दिलंस की मी तुला?
कळलंच नाही.
विचारांच्या याच गोतावळ्यात दोन वर्ष कशी सरली?
कळलंच नाही.
खरं तर मी तुझी माय, पण कधी तू ही बनतेस माझी माय,
कसं? ते कळतंच नाही.
कसं जमतं गं तुला? छान निरागस हसणं?
आणि माझ्या दिवसभराच्या शीणावर अलगद फुंकर घालणं.
माझ्या घरातली कळी अशीच हळू हळू उमलू दे,
मायलेकीचं आपलं नातं, असंच छान बहरू दे
