STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

तुझ्यासाठी

तुझ्यासाठी

1 min
186

आलोय तुफानांना भेटून तुझ्यासाठी

मृत्यूस सखी आली रोखून तुझ्यासाठी

पाऊस किती झाला शहरात नदी आली

पूरात सखी आलो पोहून तुझ्यासाठी

माझे मन थरथरले बागेत फुलासाठी

काटयांत गुलाबाला पाहून तुझ्यासाठी

दुष्काळ किती होता वाळून फुले गेली

आलोय ऋतू सारे घेऊन तुझ्यासाठी

दैवात तुझ्या माझ्या भेटीच कुठे होत्या

आलो नशिबालाही बदलून तुझ्यासाठी

वाटेत तुझ्या माझ्या अंधार किती होता

आयुष्य सखी आलो जाळून तुझ्यासाठी

प्रेमात तुझ्या पंकज वेडा बनला भुंगा

बंदिस्त फुलामध्ये होऊन तुझ्यासाठी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance