STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

लफडं लावणी

लफडं लावणी

1 min
0

**धृपद** मला उसाच्या शेतात नाचवलं गं,
नाचवलं!
 माझं धोंड्यानं डफडं वाजवलं!
 मला उसाच्या शेतात नाचवलं...

**कोरस** हिला उसाच्या शेतात नाचवलं गं,
हिचं धोंड्यानं डफडं वाजवलं! घे नाचून पोरी,

घे नाचून! कंबर लचकवून नाच गं!
तुझं गावात गाजतंय लफडं गं,
बाई, तुझं पितळ पडलंय उघडं गं!
 तुझं गावात गाजतंय लफडं गं,
बाई, तुझं पितळ पडलंय उघडं गं!
 **कडवे १** मी दूध विकायला बसले,
पार विचारात गर्कच झाले.
रात्रीचे वाजले सात गं, सात!
मी बसले गालावर ठेवून हात.
माझं पाहून दुधाचं भांडं गं,
माझ्या मागं लागलाय सांड!

 **कोरस** हिचं पाहून दुधाचं भांडं गं,
 हिच्या मागं लागलाय सांड!
तुझं गावात गाजतंय लफडं गं,
 बाई, तुझं पितळ पडलंय उघडं गं!
 तुझं धोंड्यानं डफडं वाजवलं...

 **कडवे २** मला मळमळ व्हायला लागली,
 अन् पोटात दुखायला लागलं.
माझ्या कंबरीत इंजेक्शन टोचलं,
माझं लघवी अन् रक्त तपासलं.
 मी मटण खाऊन पोट फुगवलं गं,
माझं धोंड्यानं डफडं वाजवलं!
 **शेवटचा कोरस**
हिनं मटण खाऊन पोट फुगवलं,
हिचं धोंड्यानं डफडं वाजवलं!
हिनं मटण खाऊन पोट फुगवलं,
हिचं धोंड्यानं डफडं वाजवलं!

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance