STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

4  

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

सुटेना पैठणीची गाठ

सुटेना पैठणीची गाठ

1 min
0

नजरेला नजर भिडली थेट,
झालीया आज माझ्या रायाची भेट!
तरी सुटेना पैठणीची गाठ गं गाठ...

 **कोरस:** इश्काची पेटलीया आग,
हिच्या नवऱ्याला आलिया जाग!
 हिला पैठणीची सुटेना गाठ गं,
सुटेना पैठणीची गाठ!

 त्यानं हातात धरलाय माझा हात,
उरात उठलीया इश्काची लाट!
चुंबनाची त्यानं केली बरसात,
उघडी पडलीया बघा माझी पाठ;
तरी सुटेना पैठणीची गाठ गं गाठ...

 **कोरस:**
 इश्काची पेटलीया आग,
हिच्या नवऱ्याला आलिया जाग!
 हिला पैठणीची सुटेना गाठ गं,
सुटेना पैठणीची गाठ!
 

मला मिठीत आवळून घेतलं,
ओठांचं अमृत पिऊन घेतलं!
नखऱ्यानी मला झुरवून मारलं,
 रंगात येऊन खेळतया खेळ;
माझ्या बांगड्या फुटल्या गं माय,
 तरी सुटेना पैठणीची गाठ गं गाठ...

 **कोरस:**
इश्काची पेटलीया आग,
हिच्या नवऱ्याला आलिया जाग!
 हिला पैठणीची सुटेना गाठ गं,
 सुटेना पैठणीची गाठ!

जवळ ओढून केले गाल लाल,
मी पदरामध्ये लपवलाय माल!
 घामानं झालीया मी पार बेहाल;
शेवटी खिशातनं काढली शंभराची नोट,
 अन् एका झटक्यात सुटली पैठणीची गाठ!

 कोरस...इश्काची पेटलीया आग,

हिच्या नवऱ्याला आलिया जाग!
हिची पैठणीची सुटली गाठ गं,
सुटली पैठणीची गाठ! 




Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance