STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Classics

4  

PANKAJKUMAR THOMBARE

Classics

फक्त नावापुरते बापू

फक्त नावापुरते बापू

1 min
2

फक्त नावापुरते बापू

आज दोन ऑक्टोबर, गांधी जयंतीचा सण,
पण कोरडं पडलंय आज, माणुसकीचं अंगण.
'सत्य आणि अहिंसा', फक्त पुस्तकांतच राहिले,
बापू, तुमचे ते विचार आता, काळानेच गिळले.

नोटांवरच्या चित्रात, आम्ही तुम्हाला जपलंय,
पण तुमच्या तत्त्वांना मात्र, कधीच मातीत गाडलंय.
चौका-चौकात उभे आहेत, तुमचे निमूट पुतळे,
पण तुमच्या मूल्यांचे इथे, रोज पडतात तुकडे.

कॅमेऱ्यासमोर फिरतो, फक्त स्वच्छतेचा झाडू,
मनात साचलेल्या कचऱ्याला, सांगा कधी आम्ही काढू?
'वैष्णव जन तो तेने कहिये', भजन फक्त ओठांवर वाजतं,
पण दुसऱ्याचं दुःख पाहून, कुणाचं हृदय आता रडतं?

हातातल्या त्या काठीचा, आधार आता उरला नाही,
तुम्ही दाखवलेल्या मार्गाचा, मागमूसही दिसला नाही.
नावापुरते उरले बापू, रस्ते, पूल आणि वॉर्ड,
माणूस मात्र हरवलाय, करून स्वतःचीच कोंडी.

माफ करा बापू आम्हाला, तुमचा मार्ग आम्ही सोडला,
तुमच्या स्वप्नातला भारत, आम्हीच असा मोडला.
खरंच, फक्त नावापुरतेच, तुम्ही आज उरले आहात,
तुमच्याच देशात विचारांनी, तुम्ही पोरके झाले आहात.

---------------------------------
कवी: पंकज कुमार उत्तम ठोंबरे 
पत्ता: कोंडोली, वाशिम 
संपर्क: 9503717255


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics