STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Romance Tragedy

4  

PANKAJKUMAR THOMBARE

Romance Tragedy

निरोपाच्या सरी

निरोपाच्या सरी

1 min
2



निरोपाच्या सरींमध्ये तुला विश्वास पाठवते
तुला मी पावसामधला जुना सहवास पाठवते

दुराव्याच्या व्यथेने मन कधी दाटून आल्यावर
अशा वेळी मिठीचा मी तुला आभास पाठवते

तुझ्या वाटेतला अंधार काळाकुट्ट झाल्यावर
उजेडाचे तुझ्यासाठी नवे आकाश पाठवते

उन्हाळा सोसला आहे सख्या मी वाळवंटाचा
तरीसुद्धा तुला मी श्रावणाचा मास पाठवते

पुन्हा परतून येण्याची नसे उरली अता आशा
हवेच्या सोबतीने मी तुला हा श्वास पाठवते

-..पंकज कुमार उत्तम ठोंबरे 
  कोंडोली, वाशिम 
  संपर्क: 9503717255


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance