STORYMIRROR

Shilpa Kodape

Romance

3  

Shilpa Kodape

Romance

वृद्धावस्थेतील प्रेम

वृद्धावस्थेतील प्रेम

1 min
258

असले जरी वयात अंतर आपल्या

तरीही अजुनी प्रेमात अंतर आले नाही

पन्नास वर्षांपूर्वी तु कोरलेले तुझे नाव 

अजूनही मनात कायम आहे


मी तुला पाहता क्षणी तुझा झालो होतो

एक तुला सोडून बाकी सारे जग विसरलो होतो

आज वयाची साठी ओलांडलीस तू

तरीही मला तू सोळा समान भासतेस


लाखात एक होतीस तू, लाखात एक आहेस तू

लाखात एक राहशील तू 

वाळवंटी माझ्या आयुष्याला हिरवं रान तू केलंस


उन्हात सावली तुझे प्रेम

पावसाचा प्रत्येक थेंब तुझे प्रेम

गुलाबी थंडी तुझे प्रेम


माझ्या प्रत्येक श्वासावर  

माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर

माझ्या जगण्यावर, माझ्या प्रेमावर हक्क आहे तुझा


माझी तू आणि तुझा मी 

अशीच राहो आपली साथ

जशी दिवा आणि वात


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Romance