STORYMIRROR

Prashant Kadam

Romance

4  

Prashant Kadam

Romance

मदमस्त अदा !!

मदमस्त अदा !!

1 min
741


मदमस्त अदा


तरतरीत तारुण्य तूझे अन्

ते सहज लाघवी बोलणे


खळखळूनी हासतांना बघ

ते शुभ्र मोत्यांचे चकाकणे


ओठ ओठी दाबुनी हसतांना

ते गालावरी कळीचे खुलणे


भोर त्या काळ्या बटीचे नभ

ते गोबऱ्या गालावरी रेंगाळणे


कटाक्ष तूझ्या नजरेचे अन्

ते लाज लाजून पाहणे


लगबगीने तूझे धावणे अन्

ते मुरडत मुरडत चालणे


साऱ्याच तूझ्या मदमस्त अदा

राहू देत निरंतर, हेच देवा मागणे


Rate this content
Log in

More marathi poem from Prashant Kadam

Similar marathi poem from Romance