STORYMIRROR

Shamal Kamat

Romance

4  

Shamal Kamat

Romance

वेडी मैत्रीण

वेडी मैत्रीण

1 min
263

रोज तो मला भेटत होता

माझ्याशी खूप काही बोलत होता

मनातल्या गुजगोष्टी सांगत होता

कारण तो मला एक खरी मैत्रीण मानत होता ।।धृ ।।


दिसायला सुंदर, बोलायला रूबाबदार

थोडासा खट्याळ ,पण तेवढाच जबाबदार

कोणालाही प्रेम करायला लावेल असा होता

खरेच प्रेम करायला लागले होते मी त्याच्यावर

पण तो मला एक खरी मैत्रीण मानत होता।।१।।  


पण नियतीने वेगळेच ठरवले होते

प्रतिक्षा होती त्याच्या विचारण्याची

दिला असता लगेच होकार

पण बोलला लग्न ठरले आहे माझे नात्यात,अन केला ह्रदयात वार!

सर्व प्रथम मलाच सांगायचे हे मनाशी ठरवून आला होता

कारण तो मला एक खरी मैत्रीण मानत होता।।२।।


रोज मला तिच्याबद्दलच सांगत होता

त्याची पसंती जवळपास निश्चित होती

टाळत होते त्याच्याशी बोलणे आणि रोजचे भेटणे

कारण माझ्या मनाचा रसभंग , प्रेमभंग झाला होता 

भोगत होते यातना,पण सांगू शकत नव्हते

कारण तो मला एक खरी मैत्रीण मानत होता।।३।।


एक दिवस त्याने अडवला माझा रस्ता

विचारले का हा अबोला

वाट पाहतो आहे तुझ्या होकाराची

मी आवडला नाही का तुला

त्या नात्यातील मुलगी तूच वेडू

सांगून दिला सुखद धक्का

झाले गैरसमजाचे मळभ दूर

मिळाला आयुष्याचा गडी पक्का

काय करू, कोणाला हा आनंद सांगू

कळत नव्हते खरेच आता

कारण त्याच मैत्रीणीला माझा तो

आता प्रेयसी मानत होता ।।४।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance