STORYMIRROR

Mrudula Raje

Romance Others

4  

Mrudula Raje

Romance Others

मधु-मालती

मधु-मालती

1 min
573

हृदयात माझ्या आज फुलला वसंत प्रीतीचा।

घेऊन येई तो गंध गुलाबी मधुमालतीचा ॥


मधुमालतीने भरले रंग जीवनात माझ्या।

गंधीत होऊन आले मी प्रेमिका भेटीला तुझ्या॥


ही नाजूक, कोवळी लतिका जशी तरूला बिलगून राही।

मम जीवनी तू आधार बनुनी, नित्य निरंतर राही॥


नजरेने जरी करशील मजवर , तव प्रीतीचे सिंचन।

जीवन माझे बहरून जाईल, होईल काया मम कांचन॥


अशीच साथ दे, जीवनात मज मधुमालतीच्या फुला।

अंतरंगी ठेवीन जपून तुज, कधी न अंतर देईन तुला॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance