STORYMIRROR

Mrudula Raje

Others

3  

Mrudula Raje

Others

जादूगार

जादूगार

1 min
122

तुझ्या शब्दांतली जादू माझ्या मनाला सुखवते 

ग्रीष्मातील तप्त भूमीस जैशी वळीवधार शांतवते 


तुझ्या हाताचा स्पर्श करतो मनावर जादू 

जणू सांधतो मनामनामध्ये शब्दांविण संवादु 


देहातुनी गंध परिमळे, सुगंधित वातावरण भोवती 

जाईजुई, मोगरा दरवळे, तव अद्भुत दिव्य रुपाकृती


प्रत्येक कृतीमध्ये तुझ्या उत्साह असतो भारला

हा जोश खरा , की जादूभरा आनंदरस तू प्राशिला 


सूर तुझ्या गळ्यातील जेव्हा गीत गातो मधुर अंगाई

लडिवाळ तव भावनांना निद्रादेवी प्रेमळ साथ देई


नसतेस तू साथीला जरी, अस्तित्वाचा होतो आभास 

जादू तुझी की किमया म्हणू , भासे मला हा मधुमास 


छायेतही तुझ्या दडली माया, जी उमटवी अंगावर शिरशिरी 

जणू स्पर्शभास मज होतसे, ही तुझीच अनुपम जादूगिरी  


तू ईश्वराची प्रतिमा आई , अंतर्यामी तव ईश्वर वास करी 

तो जादूगार सर्वश्रेष्ठ असे, त्याचीच तू जादूई कारागिरी       


Rate this content
Log in