STORYMIRROR

Mrudula Raje

Others

3  

Mrudula Raje

Others

जंगल में मंगल

जंगल में मंगल

1 min
117

प्रत्येक माणसाच्या स्वभावामध्ये असतो एक पशू दडलेला 

कधी तो असेल हिंस्र श्वापद, कधी तो नाठाळ बैल अडलेला 


वाघ, सिंह,जरी पशू जंगलातील; वाटतात माणसास भयानक 

माणसात वसलेला क्रूर श्वापद,झडप घालतो माणसावर अचानक 


जंगलातला कोल्हा कपटी, लांडगाही लबाड दिसतो 

समाजामध्ये वावरताना राजकारणी नेता तो बनतो


दबाव धरुनी बसतो जेव्हा तो भेदरलेल्या सशावरी 

माणसांतला घाबरट ससा लपून बसतो बिळांतरी


जंगलामध्ये कधी सापडती रानडुकरे वा जंगली अस्वले

कधी माणसानेही तुम्हाला खाल पांघरून असेल फसवले 


हरीण, काळवीट, नीलगाय, सांबर, हे शोभा वाढवती जंगलाची 

गरीब बिच्चा-या ह्या प्राण्यांवर पण वाईट नजर क्रूर श्वापदांची 


झाडाच्या ढोलीत राहते खार , उचलते भार कधी माणुसकीचा कधी माणसांतला सज्जन, सहाय्य करुनी उचले वाटा खारीचा 


शहरी मानवाच्या कळपामधले हिंस्त्र पशू कधी करिती दंगल 

सिमेंटच्या ह्या जंगलास पाहून , पटते मनास, "जंगल में मंगल!"              


Rate this content
Log in