दिवाळी मनाची
दिवाळी मनाची
दीप दिवाळीचे लक्ष उजळू देत तेजाने घर-अंगण तुमचे
उदासलेल्या एका मनामध्ये आशेचा दीपक जरूर लावा
दिवे विजेचे वाढवतील सौंदर्य खूप तुमच्या घराच्या भिंतींचे
काजळलेल्या एखाद्या मनामध्ये आकांक्षांची बाग जरूर फुलवा
अंगणामध्ये रोज सजू देत सप्तरंगी रांगोळी नवी
चेह-यावरती लाली फुलवून कोणाला हास्याचा नजराणा द्यावा
बागेमधली सुगंधित पुष्पे रोज घरात सजवून मांडावी
झोपडीतल्या अजाण मुलांच्या चेह-यावर गुलाब जरूर फुलवा
पेटवा फटाके, फुलबाज्या, लवंगी, अनार त
ुम्ही मौजेने
पण मनातल्या अहंकारास जाळण्या एक काडी जरूर लावा
लाडू , चकल्या, शंकरपाळी , करंजी, फराळ वाटा हौसेने
पण दोनच तुमच्या मधुर शब्दांनी मनात गोडवा जरूर फुलवा
भेटवस्तू आणा किंमती कितीही आपल्या जिवलग आप्तांसाठी
अनाथाश्रमातील मुलांना तुम्ही केवळ मनीचा जिव्हाळा वाटावा
आकर्षक कपडे , अलंकार सुंदर, करा खरेदी दिवाळीसाठी
तन सजेल तुमचे, मनासही पोषाख सत्याचा जरूर चढवावा