STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Romance Classics Others

4  

Meenakshi Kilawat

Romance Classics Others

कान्हा करतो खोड्या

कान्हा करतो खोड्या

1 min
134

मंजुळ कुंजन करी पाखरे

अरुणोदय हा झाला

थव्याथव्याने घेई भरारी

वेचून आला पाला..


निळ्या जळी या वाहे 

मस्तीत सुंदर भासे होड्या 

यमुनेकाठी राधेसोबत

कान्हा करतो खोड्या..


हिरवाईने नटून-थटून

उंच कड्यावर डोंगर 

तरुवेली या मृद्गंधाचा

भरे भरारा अंबर..


झुला झुलती राधा राणी

कान्हा संगे वृंदावन 

वेडी होई राधा ऐकून 

मोहक बासरीची धून..


आकाशी या इंद्रधनूच्या

छटा विहंगी वारे

प्रियात रमे रंगात भरे

व्याकुळ न्यारे नखरे..


शुभ्र दुधाच्या उंचावरुनी

उडती तुषार धारा  

येती मनात असंख्य लहरी

शांतवितो हा वारा..


करे जलक्रिडा कान्हा अन्

जळती गोपिका बाला 

रास खेळती खट्याळ गोपी 

मध्यरात्रीला लीला....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance