गझल-हृदयात ठेवले मी सजवून
गझल-हृदयात ठेवले मी सजवून


गझल...
आनंदकंद : गागालगा लगागा गागालगा लगागा
हृदयात ठेवले मी सजवून य उखाणे
वेशीस टांगले मी दु:खातले बहाणे...!!
ओठावरी तयांच्या नावे नवी नव्याने
अस्तित्व आज माझे झाले जुणे पुराणे..!!
आश्चर्य पाहिले मी डोळ्यात त्या उगाची
हिणवीत आज होते तरक्कीस ती घराणे..!!
थर साठलेत माझ्या हृदयात आज मोठे
आता नकोत कोठे जखमेतले रकाणे...!!
त्यांच्याच कारणे बघ आस्मान पेलले मी
जाणून दैन्य येथे केले रिते खजाणे...!!
प्रश्न मात्र जीवघेणे जावून त्यात फसणे
नाही म्हणावयाला केले किती बहाणे..!!
जीवन जगून झाले कर्तव्यास जवळ केले
जगण्यात मात्र माझ्या उरले इथे उखाणे..!!
मीनाक्षी किलावत (अनुभूती) वणी यवतमाल