गजल*या चांदण्यात तू कधी*
गजल*या चांदण्यात तू कधी*
गजल*
या चांदण्यात तू कधी
थांबशील रातभर या चांदण्यात तू कधी
भेटण्यास आतुर मी भारतात तू कधी...!!
पौर्णिमेची आज रात शरद ऋतु हासतो
या सुखास ठेव जपुन काळजात तू कधी...!!
तूच चंद्र तारका सखी स्वरूप सुंदरी
दूर का उभी अशीच ये स्वप्नात तू कधी...!!
सरयु वाहते इथेच आश्रमात राहते
जानकीस भेट राम मंदिरात तू कधी...!!
भंगलेत स्वप्न आज शाप काय भोवला
विरह सोसला कितीक एकट्यात तू कधी...!!
मैफिलीत सूर साधता अनहद नाद तो
भैरवीस गात शायर रडलात तू कधी....!!
रोज घरटं वाळुचे नवीन बांधतोय मी
सागरा नकोस मोडु वादळात तू कधी...!!
सर्व सुखीन संतुचाच आशिर्वाद दे मला
ईश्वरीय तत्व भरावि माणसात तू कधी.....!!
मीनाक्षी किलावत (अनुभूती )वणी...