ग़ज़ल - देवप्रिया,"तू मला भेटून जा
ग़ज़ल - देवप्रिया,"तू मला भेटून जा
ग़ज़ल वृत्त - देवप्रिया,"तू मला भेटून जा"
चंद्र आहे आसमंती तू मला भेटून जा.....
प्रीत माझ्या अंतरीची तू जरा जाणून जा.....
साजणा जाऊ नको तू एकटीला सोडुनी
ही जुनी वचने दिलेली तू जरा पाळून जा....
गीत मीराचे इथे ऐकून आला श्रीहरी
बासरी बघ वाजते ही सूर तू साधून जा....
भावनांचा गंध भिनवीला जसा श्वासात मी
संयमाचा गंध माझ्यातून तू काढून जा.....
चांदण्याची रात्र आहे भेटण्या आतूर मी
आपल्या भेटीस साक्षी चांदणे ठेवून जा....
विरह जीव
ा पोळतो बघ दूर तू गेलास का
आसवे येतात नेत्री तडक तू येवून जा....
तूच माझा चंद्र अन मी चांदणी रे राजसा
हळुच फूंकर काळजावर आज तू मारून जा....
माळला मी आज गजरा बघ सुगंधी मोगरा
प्रीत गजरा अंगअंगी आज तू माळून जा.....
प्रेमिकांचे स्वप्न पुरते पूर्णत्वाला ने सख्या
दोन जीवा भेटण्याला ही दरी मिटवून जा.....
राहते विरहात आहे भेटल्यावर वेदना
वेदनेची शल्य फुले ती तू जरा वेचून जा.....
मीनाक्षी किलावत अनुभूती वणी