ग़ज़ल -काही विशेष नाही वेडा मला
ग़ज़ल -काही विशेष नाही वेडा मला


ग़ज़ल वृत्त - आनंदकंद
काही विशेष नाही वेडा मला म्हणाया
आनंद होत असता येते मला हसाया.....!!
कारण मला लळा हा जाती समानतेचा
येवू नकाच कोणी मज तसलि समज द्याया..!!
इतकी कठोर आहे काळीज घाटबंदी
सांगू नकाच कोणी गाणी उदास गाया....!!
खेळात कोणत्याही नव्हतोच मी कधी ही
माझ्या पराभवाच्या का सांगता कहाण्या....
प्रेमामध्येच रडले प्रेमामध्येच हसले
भलत्याच आठवाणी आले मला रडाया......
नाही दिला कधी मी धोका कुणास काही
नाही फिकीर केली प्रारब्ध सावराया....!!
गर्भात प्रकृतीच्या घटना युगायुगाच्या
खाना खुणा पुरेश्या आजन्म गुणगुणाया....!!
मीनाक्षी किलावत (अनुभूती) वणी