प्रेम
प्रेम
प्रेम तुझेे माझे सख्या
निर्मळ भावनांचे
अस्वस्थ या मनात
गुढ राहीलेले।
का ?छेडतो मला हा
बेभान धुंद वारा
ओठात मिलनाचे
गीत गायलेले।
ही कालची मी आता
झाले तुझीच प्रिया
भेटीत भावनांचे
अस्तित्व पेरलेले।
हा चंद्रमा नभीचा
तू कधीच झाला
बाहूत साठविला
हृदयात सामावला।
तुफान सागराला
आहे हा किनारा
मी वेडी सागरिका
किनारा तुच आता ।

