वसुंधरा
वसुंधरा
1 min
11.4K
वसुंधरा ही सोज्वळ रुपी
नटली हिरव्या रंगाने
पसरली भूवर ॠतू कांती
जणू अंथरली सृजनाची झालर
ऋतुरंगात या जगही सुखावले
सुखाच्या सरीत आकंठ बुडाले
पण किती जग हे स्वार्थी
वसुंधरेला क्षणात विसरले
धनाच्या हव्यासाने वृक्षतोड झाली
प्रदूषणाने उच्चांकाने माणसे मेली
पशुपक्षांची कत्तल झाली
वसुंधरा माझी उध्वस्त झाली
नको करू रे माणसा असा अनाचार
का करतोस तु मातेला वांझ
तिच्या अंगावर खेळलास ना राजा
फेड थोडेतरी तिचे उपकार
