STORYMIRROR

Nita Meshram

Others

3  

Nita Meshram

Others

आई - बाबा

आई - बाबा

1 min
11.8K

आईबाबा माझे थोर

दिले संस्काराचे धन

शिक्षणाचा दिला वसा

मार्गी लागले जीवन


का जाऊ तिर्थस्थळी

दिसे भगवंत त्यांच्या ठायी

आशीर्वाद राहू दे असाच

टेकते माथा त्यांच्या पायी


लेकरांच्या प्रेमापोटी

दिन-रात ते राबले

भुक आमची भागली

ते उपाशी निजले


संघर्षपूर्ण जीवनात या

आई-बाबा जणू सुखाची झालर

साऱ्या जगात दुसरे नाही

 पवित्र असे रूप निराकार


 जन्म घेता तुमच्या पोटी

 धन्य झाले हे जीवन

 पाठीवर असू दे सदा

प्रेमळ कर तुमचे ते सुजाण


Rate this content
Log in