STORYMIRROR

Nita Meshram

Inspirational

3  

Nita Meshram

Inspirational

असा राजा होणे नाही

असा राजा होणे नाही

1 min
148

राजा असा होणे नाही रणशूर लढवय्या

लढला निधड्या छातीने वाघाचा तो छावा


छत्रपतींचा आशीर्वाद ललाटी विजयाचा टीळा

बाहूत लक्ष हत्तींचे बळ दिसे लाखात देखना


लहान-थोरांचा मान राखी रयतेचे केले रक्षण

बोलण्यात धार ऐसी, होती शत्रुचे मनसुबे बेचिराख


फुंकीले रणशिंग ऐसे औरंगजेबास आणले जेरीस

म्हणाले दिल्ली सोड अन्यथा दख्खनेत बांधीन कबर


तेवढेच कनवाळू मन रायबा व कवी कलशाचा मित्र

पण घरच्याच फितुरीने सापडला मुघलांच्या हातात


मुस्लिम झाले तर करीन मुक्त म्हणे औरंगजेब

नाही म्हणाले संभाजी राजे सोसल्या वेदना अनंत


जिव्हा कापली तरीही राजे लिहून धाडीले

मुलगी दिली तरी होणार नाही हे शक्य


चवताळून औरंगजेब दिले जीवे मारण्याचे आदेश

देहाची विटंबना करून मारीले खांड-खांड करून


कवी कलशाने दिली साथ धन्य तो वीर अमर

ऐसे राजे संभाजी राजे थोर जन्मले या भूवर


त्रिवार नतमस्तक कवयित्री त्यांच्या चरणावर

द्या राजे शक्ती जगी लढण्याला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational