STORYMIRROR

Nita Meshram

Others

3  

Nita Meshram

Others

माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र

माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र

1 min
12.9K

जय महाराष्ट्र देशा

जय क्रांतीच्या देशा

जय महापुरुषांच्या देशा

प्रिय महाराष्ट्र देशा


धन्य जाहले मी

जन्म येथे झाला

सुंदर महाराष्ट्र मी

स्वप्नात असा पाहीला


नाही जेथे जात-धर्म

मानव ही एकच जात

नाही जेथे शोषक कुणी

नाही कुणी शोषीत


आहे जेथे नारीचा सन्मान

आहे ती सदैव सुरक्षित

अत्याचारी कुणी ना राहिले

झाल्या महिला आश्वस्त


कुणी न उपाशी पोटी येथे

मिळे सर्वांना पोटभर अन्न

रहातील आनंदे सर्वच

राहील न कुणी रोजगार शुन्य


असावा असा माझा महाराष्ट्र

सुंदर, आनंदी, समृद्ध,छान

कविची कल्पना सत्य ठरावी

गाईन हर्षाने मधूर गाणं


Rate this content
Log in