STORYMIRROR

Nita Meshram

Others

3  

Nita Meshram

Others

पाण्याची समस्या

पाण्याची समस्या

1 min
183

पाणी आणण्या अनवाणी

रखरखत्या या उन्हात

एक डोक्यावर तिच्या 

 एक घागर कमरेत 


वेळ होता ही न्याहारीची

लगबगीने निघे पोर

आणते पाण्याची घागर

मगच होईल बिनघोर 

 

उन्हातान्हात ग धनी

येईल थकून कामाहून

पेईल थंडगार पाणी 

भाकर-तुकडा खावुन


समाधानाने ती हसली

पाणी मिळाले म्हणून 

साता जन्माची जणू पुण्यायी

पदरी पडली म्हणून 


उन्हाळ्यात पितो पाणी 

अमृताहून गोड मानून 

मुबलक मिळते तेव्हा 

देतो वाया घालवून


Rate this content
Log in