STORYMIRROR

Nita Meshram

Tragedy

3  

Nita Meshram

Tragedy

माझ्या दुःखाची

माझ्या दुःखाची

1 min
209

माझ्या दुःखाची जात वेगळी आहे

व्याकूळ हृदयाची हाक वेगळी आहे


स्तब्धता त्या क्षणाची आस वेगळी आहे

भग्न स्वप्नांची राख वेगळी आहे


विरला गोडवा तो नाती बेगडी होती

जखमांचे कोंदण लेणे उगाच भावना आहे


नाही पर्वा आता कोणत्या नात्यांची

नाही आता कोणाच्या मरणाचे दुःख आहे


विसावा क्षणाचा का हा अपुराआहे

वाटे का असे मरणातच सुख आहे


अस्तित्व संपलेले भास बहुल झाले

जळक्या सरणावरची राख वेगळी आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy