STORYMIRROR

Nita Meshram

Inspirational

3  

Nita Meshram

Inspirational

भीमा तुझी याद आली

भीमा तुझी याद आली

1 min
11.6K

गावकुसाबाहेरचे आम्ही गावकुसात आलो

जिंकल्याच्या नशेत रापलेला चेहरा

आयनात न्याहाळू लागलो

सवर्णांच्या गर्तेत सामील झालो

जातीचं गाठोडं गुंडाळू लागलो

समाजात मोठ्या विश्वासाने वावरू लागलो

पण जेव्हा नजरेत आमची

जात भरायला लागली

तेव्हा भीमा तुझी याद आली


तू संविधानात हक्क, अधिकार दिलेस

पण तू दृष्टीआड होताच

तिच झाली आमची गती

आया-बहिणींची इज्जत लुटली जात आहे

नग्न करून धिंड काढली जात आहे

आवाज उठविणारे मारले जात आहेत

कुठे खैरलांजी कुठे भीमा कोरेगाव

दंगल घडते आहेत

आक्रोशाची कुणाला ना जाग आली

तेव्हा भीमा तुझी याद आली


भीमा तू संविधान दिलंस

पशूत गणना होणारे आम्ही

कधी नव्हे ते माणसात आलो

पण माणुसकीची जवा कत्तल झाली

तेव्हा भीमा तुझी याद आली

भीमा आता तुझा कायदाच

आमचा वाली झाला आहे

या शस्त्राने मनगटात बळ आणले आहे

जगण्याची नवी उमेद निर्माण केली आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational