व्यर्थ गैरसमज
व्यर्थ गैरसमज
व्यर्थ गैरसमजात माणूस लीन आहे
इतरांच्या भावनांची कुणाला कदर आहे
कुणाला येथे मिळे रोज तुप रोटी
कुणा शिळ्या अन्नाची भ्रांत आहे
कुठे टोलेजंग इमारती उभ्या
कुठे फुटपाथवर पहुडलेली
अर्धनग्न अर्धपोटी मुले माणसे आहेत
त्यांच्या जगण्याची कुणाला फिकीर आहे
रस्त्यावर अन्नासाठी रडे भिकारीन वृध्द
अंगावर दिसे तिच्या वस्त्र विरल झालेले
लोका सांगे ती लेक साहेब आहे
श्रीमंत लेकाची मी अनाथ माय आहे
लहानपणी ज्याला दिन-रात जपले
त्यानेच मला अन्ना्न्न दशा करून सोडले
फसवे नाते फसव्या भावना
फसवी माणुसकी
माणूसपण विकले गेले देवा
कवडीमोलाच्या किमतीत
माणूस जिंकल्याचा नशेत
धुंद जगत आहे
