भेट
भेट
कधी,कुठे तुला पाहिले की
हृदयाचा ठोका चुकतो,
संपतो खेळ सारा मग
पापण्यांचा इशारा होतो,
भिडताच नजरेला नजर मग
काळजात घाव होतो,
दिसणे तुझे राधे सारखे मग
कृष्णाला ही मोह होतो,
तुझा नजरेचा इशारा मग
सुटलेल्या बाणासारखा
हृदयात घुसतो,
तुझे इतके सुंदर असणे मग
तुला पाहत पायात काटा टोचतो,
होती भेट तुझी तेव्हा मग
कवितेला पान्हा फुटतो।

