पुन्हा एकदा...!
पुन्हा एकदा...!
पुन्हा एकदा तीच हुरहूर, पुन्हा एकदा तीच चाहूल...
पुन्हा एकदा मनाला तुझ्याच प्रीतीची भूल ...
पुन्हा एकदा नजरेचे तुला शोधण्या धावणे...
पुन्हा तुझ्या भेटीसाठी आतुर होऊ पाहणे..
पुन्हा एकदा नव्याने तुला आठवावे...
पुन्हा तुझ्या सवे बोलण्याचे बहाणे मिळावे...
पुन्हा एकदा तू मला रोखून बघावे...
पुन्हा एकदा मी गोड लाजेत नहावे...
पण... पुन्हा एकदा मिळतील का जुन्याच त्या खुणा..?
अन पुन्हा एकदा पाऊस सरी शमवतील का या उन्हा..?
पडतील का रे ती जुनी चांदणे, माझ्या अंगणी पुन्हा..?
ओंजळी भरून सुख लहरी देशील का तू पुन्हा..?

