ही भेट
ही भेट
माझ्या प्रियाच्या कर्तृत्वाची भरारी डोळेभरून दिपावी आज वाटे
दृष्ट काढावी मीठाने जराशी नि मिठीत घ्यावे तुला असे रोज वाटे
तू साकारलेले यशाचे किनारे कायम असेच भरभरून वहावे
माझ्या कृष्ण प्रार्थनेचे बळ तुझ्या पाठीशी निरंतर असावे..
तुझे माझ्यावरचे प्रेम मला न बोलता ही ठाऊक आहे
तुझ्या प्रत्येकवेळी केलेल्या प्रयत्नाची मला जाण आहे
तुझ्या मज साठीच्या काळजीचे मला अनुमान आहे अन
तू गाठलेल्या शिखराचा मला कायम अभिमान आहे ..
तुझ्या अवघड प्रवासाची तिढा मज मानसी लाभू दे
तुझ्या भावनांचा कल्लोळ मज हृदयी साठवू दे
ऊब मिळावी तुला मज प्रेमाची अंतरावर दूर ही
तुजसवे कायम मज भेटीची ही गुलबंद राहू दे...
भेट तुझी माझी उरी घट्ट जपेन मी..
अश्रूंची बरसात डोळ्यात खोल लपवेन मी..
तू मुक्त संचार करावा सोडून काळजीचा पसारा
माझ्या मानाच्या वादळांना असे सांभाळेन मी..
पूर्ण कराया आस राहो मनी तुझ्याही थोडी,
अधुरीच ठेवेन ही भेट मी अधुरीच बात राहील
फिरूनी जग सारे जेव्हा आठवेन अपुरी ओढ ही
बहरून प्रीत पुन्हा तेव्हा खरी येईल ही..
येशील तू परतून मायदेशी जोवर
मज प्रेमाचा नवरंग बरसेल मी तुझ्यावर
भेटीस तुझ्या आतुरलेली मी मोरपंखी
मज भेटशील ना रे तू तेव्हा जन्मभर..?
-विशाखा

