Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Vishakha More

Others

4.9  

Vishakha More

Others

शोधते अजूनही...

शोधते अजूनही...

1 min
1.4K


का क्षितिजाला बिलगण्याचे, स्वप्न धूसरसे वाटते

का वेगळी आज स्वतः माझी मला मी भासते...

प्रश्न तेच तसेच अजूनही, तीच उत्तरे शोधते ओंजळीत तेच फुलांचे, गुच्छ अजूनही वेचते... 

तीच आशा, तीच मनीषा, तीच कामना मनी जरी  आज का त्या चांदण्यांचे, कवडसे सलती उरी... 

पाहुनी मी स्वप्न उद्याचे, लाजते अंतरी खरी पण मन्मनीची गर्द वादळे, भिरभिरती वाटेवरी... 

मोहरते जरी मन हे माझे, धुंद त्या मृदगंधाने का तरीही मी मिटवू पाहते, भावनांची ही स्पंदने...

सूर स्वरांना ताल देण्या, जरी आज ही आतुरते मग का अचानक पाठ फिरवूनी, माझे मला मी रोखते... 

सार्थ उभी मी कालसारखीच,अजून बघत स्वप्नांकडे हिंदोळ्यावर स्वार तरीही, पाऊल का हे अडखडे...

बालपणीचे बालमनीचे, विश्व जरी उरी मी जपले भोवतालीच्या नवलाईने त्यावर, आज जणू धुके पांघरले... 

रंग छटांच्या रंग सागरी, रंगमय हे भाव खरे पण त्या रंगांचे रंग रंगुनी, का होई मन बावरे...!!


Rate this content
Log in