का सांग ना ...?
का सांग ना ...?
तुझ्या माझ्या मनातला संवाद का हा संपला..
तुझीच असता तुलाच का हा प्रश्न खोचक बोचला..?
मी न बोलताच मनाने अर्पिले जेव्हा तुला, का तुला कळूनही
तू अचानक पाठ फिरवून थांबला..?
वेळ काळ सर्व दुवे जुनेच का तू मोजले,
अर्थ नव्या भावनांचे का एकदाही न ऐकले..?
सांग सखया तुझ्या आठवांचे गर्द धुके का मी उरी जपले..
फक्त एकदा यावेस तू विचाराया..का मी बांधुन स्वतःस ठेविले?
भावनांच्या पावसाचा का न बांध तू हा पाहिला..?
चिंब भिजण्याचा माझ्या स्वप्नांचा..का अर्थ एकदाही न तू जाणला..?
वाट बघण्याचे माझे इशारे का ना किंचित तुला उमगले,
उमगले असता स्वर माझे..का ना गीत तू ते गायिले..?
रोखून हृदयीची वादळे मी स्वप्न डोळ्यात रोखीले
येशील तू साथ द्याया हे वेड, परी मी सोसीले..?
तुझ्या मनीचे ओले वलय ते का अचानक ओसरले..?
सांग का त्या भावना खोट्या की तू प्रेम आज मिटविले..?

