STORYMIRROR

Vishakha More

Others

3  

Vishakha More

Others

माणसामधला माणूस

माणसामधला माणूस

1 min
266

माणसानं माणुसकीला जणू वेशीवर टांगलंय ,

अन अहंकाराने भरून उंबऱ्याला बांधलंय... 

कोण म्हणतं माणूस,अजून माणूस राहिलाय 

स्वार्थाच्या भिंतीमध्ये कधीच गढून गेलाय... 


 नको त्याला प्रेम-माया, नको नाती-गोती 

पैशापुढे माय-बापाची काळजीही खोटी...

कोण म्हणतं माणसाला कुणाचीच नाही भिती 

अहो माणूसच करतो ना, माणसासाठी राजनिती...  


तंत्रज्ञानापुढे माणूस असा काही झुकला 

नैतिकता सोडून भ्रष्टाचाराला मुकला... 

कधी वाटतं बरं झालं आला हा कोरोना 

निसर्गाच्या अस्तित्वाची जाणीव तरी झाली सर्वांना... 


दारू पिऊन पार्ट्या करून उतमात सुरु होती 

एका कणभर व्हायरसने जागेवर आणली पुरती... 

शिष्टाचाराची झापडं निदान आतातरी उघडतील  

जुन्या संस्कारांचे धडे आता तरी गिरवतील... 


अरे किती तो 'मी' पणा अन किती ती उर्मी 

निसर्गच दाता नं , मग तुम्हाला कसली गुर्मी.. .

माणूस म्हणून तुम्हीही निसर्गाला देणं लागता  

जर आज ना उद्या द्यायचयं तर का असे उर्मट वागता...


कोरोना ने संधी दिलीये पापं धुवून काढायला 

संसारातली गोडी वाढवून माणुसकी परत घडवायला...

घरात राहून नैतिकता जपणं आतातरी शिकायला 

पैशासाठी तडा जाणारी नाती आता तरी जपायला... 


गरीब-श्रीमंतीची पोकळी आता तरी मिटावी 

माणसामधल्या माणुसकीला आता तरी जाग यावी... 

निसर्गासोबत माणुसकीचा झरा आता तरी स्वच्छ व्हावा 

माणसामधला खरा माणूस आता तरी परत यावा...!!


Rate this content
Log in