STORYMIRROR

Vishakha More

Tragedy

4.0  

Vishakha More

Tragedy

गर्द भावना

गर्द भावना

1 min
406

अनामिक एकाकी भाव अंतरी का मिळेना

कोण होते, काय झाले मला माझेच कळेना


शब्द मुके, श्वास चुके, स्वप्न धुके ओसरेना

स्पर्श रुक्ष, हर्ष रुक्ष का देही जाणवेना


कोण कोठे कोलाहली कर्कश ही भासवेना

कोण एक शांत तरीही शांतता ही मानवेना


काय चुकले, कोण चुकले प्रश्न शंख उलगडेना

मीच शुंन्य ठरल्याचे घाव गर्द ओघळेना


टोचणारे शब्द खोचक, व्यक्त आप्तांचे सोसवेना

माया ममता मोडकी ही व्यर्थ तरीही सोडवेना


ठेच हृदयी लागलेली कुणा कधीच जाणवेना

अन् लोकरंगी रंगण्याचे मुखवटे मज पेलवेना


तु न येसी साथ द्याया वेदना ही बोलवेना

व्यर्थ जगीचे दया प्रेम हे मज खोटे जोडवेना


नयनीची आसवे कोरडीच किंचित ही तोलवेना

भार मनाशी घट्ट कळवळून अश्रु जाणून ओलवेना


वार आजवर सोसले परी आज पोटी मज पचवेना

लढावयाचे यूद्ध तरीही बळ का हे एकवटेना


बोलू नये बोल श्रापिक परी आज मज राहवेना

जगताच्या कूट नितीस सार्थ कारुण्य पहावेना..


हृदयीचे ओले वलय तरीही कृष्ण चिन्ह मज मिटवेना 

आक्रंदती या भावना तरी सुन्न कर्णी ऐकवेना


अनामिक एकाकी भाव अंतरी का मिळेना

कोण होते, काय झाले मला माझेच कळेना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy