Vishakha More

Others

4.2  

Vishakha More

Others

आपली मैत्री

आपली मैत्री

1 min
349


आपली मैत्री जरा वेगळीच आहे.. 

सतत भांडत असलो तरीही दोस्ती तशीच आहे...  


पटत असतात मतं एकमेकांची 

पण तरीही Agree करायचं नसतं..  

वाटत असतं मनात काहीतरी 

पण कधी खरा सांगायचं नसतं.. 


नेहमी भेटत नसलो तरीही 

माहिती असतं सगळंकाही.. 

पण भेटल्यावरही एकमेकांना 

शाब्दिक वारांची कमी नाही..  


उडवा-उडवी, चिडवा-चिडवी 

का होईना अगणित.. 

मैत्री मधला निखळपणा 

कायम जपतो खणखणीत.. 


कितीही वाटलं करावी स्तुती तरी

सरळ तोंडी ती करणार नाही.. 

पण हो, तिसरा कुणी वाईट बोललेलं 

सहनही मुळीच होणार नाही.. 


खरंच, आपली मैत्री जरा वेगळीच आहे.. 

सतत भांडत असलो तरीही दोस्ती तशीच आहे


Rate this content
Log in