STORYMIRROR

Vishakha More

Others

3  

Vishakha More

Others

सृष्टीसौंदर्य

सृष्टीसौंदर्य

1 min
281

सुंदर आकाश, सुंदर प्रकाश, सुंदर झाली सृष्टी

पावसाच्या या सुंदर सरींनी जणू स्वच्छ झाली दृष्टी..


हरितपर्णांची जणू नव्याने झाली आज ओळख,

सुमनांच्या त्या मंद गांधांने नवं पालविची झाली पारख..


फुलपाखरांच्याही उत्साहाला रंग नवा गवसला,

वाऱ्याच्याही संथ झुळुकेला अर्थ नवा उमगला...


आकाशाचं जुनं मळभ जणू स्वच्छ झालं नव्याने,

विचारांची ओझं जणू आज हलक केलं मनाने...


स्वच्छ मोहरुन सुगंधित वारा चहूकडे पसरला,

जुन्या गढूळ विचारांचा कुंचला पावसात प्रत्येकजण विसरला...


अशीच वाहून जावोत सारी जुनी ऊनिदुनी,

सौख्याची सुंदर चादर पांघरत उत्साह यावा मनी..


क्षितिजामधल्या रंगछटानी नाहवी ही धरा,

मातीचा तो खोल दरवळ ओसंडू दे घरा-घरा..!


Rate this content
Log in