STORYMIRROR

Vishakha More

Abstract

3  

Vishakha More

Abstract

आयुष्यात कधी कधी

आयुष्यात कधी कधी

1 min
396

आयुष्यात कधी कधी खूप एकटं वाटतं..

मनातल्या विचारांना सहज उधाण फुटतं..

चुका आपल्या स्वतःच्याच आपण कळू लागतो..

अन् अचानक विचार येतो 'काय आपण खरेच इतके वाईट होतो?'

असे म्हणतात 'चुका प्रत्येक कडून होतात..

अन् त्याचे प्रायश्चित्त करणाऱ्यालाच खर माणूस म्हणतात!'

मग मी ही चुका केल्या नि प्रायचित्त ही केले..

पण तरीही मला अजून कुणी माफ कसे नाही केले?'

कदाचित या सगळ्यामध्ये मी एक मोठी चूक करत होते..

हक्काने येऊन कुणी मला आपलं म्हणावं अशी अपेक्षा इतरांकडून करत होते..

कळले आता की अपेक्षा ठेवण्याच्या आपल्या चुका आपल्याच अंगी येतात..

अन् हळूच सगळ्या गर्दीत आपल्यालाच एकटं पाडून जातात...

म्हणून आयुष्यात कधी कधी खूप एकटं वाटतं..

अन् मनातल्या विचारांना सहज उधाण फुटतं...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract