STORYMIRROR

Nandkishor Raut

Others Romance

4  

Nandkishor Raut

Others Romance

होरपळून निघाला जीव

होरपळून निघाला जीव

1 min
28.1K


होरपळून निघाला जीव त्या रखरखत्या उन्हात,

आसुसलेलं मन नजर खिळली होती आभाळात.


लाही लाही झाली अंगाची जगणं नकोसं झालं,

भलं मोठं काळं आभाळ वाहत डोक्यावरती आलं.


तो मोसम पावसाचा आज पुन्हा परतूनी आला,

काळ्याभोर नभातून सुरुवात झाली पावसाला.


दरवळला गंध मातीचा बेधुंद झाला आसमंत,

सोसाट्याचा वाराही अधूनमधून व्हायचा संथ.


आग विझली काळजाची बरसता या सरी,

पाणी वाहू लागलं सारा चिखल झाला दारी.


चिंब पावसात भिजूनी आज शांत झालं मन,

फुलेल आता फुलोरा हिरवी होतील पुन्हा पानं.


नटेल सारी सृष्टी आता नेसून शालू हिरवा,

किनार असेल फुलांची अन् पदरी शोभेल पारवा.


पुन्हा वाहतील धबधबे खळखळतील नद्या झरे,

भिरभिरतील सगळीकडे आता प्रेमाची पाखरे.


कविता नी शायरीही पुन्हा बरसतील थेंबासवे,

पाहावं तिकडे दिसतील फक्त शब्दांचेच थवे.


मलाही पाऊस झेलायचाय तिच्यासोबत मिळून,

या पावसात तरी मनाची नाती यावी जुळून.



Rate this content
Log in