मी न माझा राहिलो
मी न माझा राहिलो
पाहिले जेव्हा तुला मी न माझा राहिलो
भाळलो तेव्हा तुझ्यावर अन् तुझाच जाहलो
पाहिली गालावरील गोड गुलाबी खळी
उमलली माझ्या मनात तेव्हाच प्रीत पाकळी
काळ्या नागिणीच्या परी पाठीवर वेणी
पाहता कळ काळजात उठतसे जीवघेणी
गजगामीनी तुझी मंद मंद चाल गं
पाहणाऱ्याच्या जीवाचे होई हाल हाल गं
कळले मला सखे गं मीच तुला आवडतो
तुझ्या काळजात बसून हेच मी गं पाहतो
संपले अस्तित्व माझे तुझ्यात विलीन जाहलो
आनंद जीवनात , जरी मी न माझा राहिलो