ती येते
ती येते
ती येते तेंव्हा
मी भानावर रहात नाही
अाणि ती असअसल्यावर
मला एकट सोडत नाही
ती नेते मला दूरवर
एकांतात ...
इहलोकी च्या परे
ती ची नं माझी भेट
नेहमीच होत असते
मस्नात...
कधी कधी भेटते ती
गजबजलेल्या बागेत
तर कधी कधी शोधूनही
भेटत नाही आसमंतात
तीच येन मात्र
नेहमीच असतं सुखद
दिवसाच्या उजेडात
तर ती भेटतेच
पण आता रात्रीच्या
अंधारातही सराईतपणे
जवळ मला करते
ती येते तेंव्हा
मी माझा रहातचं नाही
पूर्ण तील समर्पित
झाल्याशिवाय
अाकाशाचा ठाव
दाखवते ती
प्रुथ्वीचा गर्भ
सार्याच स्रुष्टीचा
कसा उलगडून टाकते मर्म
ती येते
आणि मी नतमस्तक होतो