STORYMIRROR

Shila Ambhure

Romance

4.6  

Shila Ambhure

Romance

शृंगार

शृंगार

1 min
9.4K



(अष्टाक्षरी)


शृंगाराची ना गरज

अशी लावण्यवती तू.

दर्पनात बघ जरा

रंभेसम रमणी तू.


शुभ्र कांती ती नितळ

जणू राणीच पद्मिनी.

कुंतलांचा संभार तो

वाटे मजला यामिनी.


मज करिती घायाळ

नयनांची भिरभिर.

होता नजरानजर

गेला छेदुनिया तीर.


नाक जणू चाफेकळी

ओठ गुलाबपाकळ्या.

बिलगुनि बसली ती

वज्रटिक शुभ्र गळ्या.


नाकी नथ शोभे अति

कुंकवाची कोर माथी.

चुडा करी किणकिण

गोऱ्या नि नाजुक हाती.


पायी पैंजण चांदीचे

वाजतात छमछम.

कुडी कानाची लाजूनि

चमकते चमचम.


किती करावी स्तुती मी

झालो निःशब्द पुरता.

कवी सारे स्तब्ध झाले

काव्य तुझे गं करता.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance