कविता..
कविता..
कविता तरी काय रे माझी..
समजून कुणी घेतलीच नाही...
वर वर सगळे चाळत गेले..
शब्दांतील तू दिसलीच नाही.....
खूप ठरवलं होत स्वतःशीच..
फुलपाखरासम जपायच तुला...
लावली जरी मी बाग फुलांची...
कधी त्यात तू दिसलीच नाही....
समोर असताना बघ कधी....
शब्द मला सुचलेच नाही....
अबोल अबोल राहील सर्व...
अंतर मलाही तुटलेच नाही....
वहायचं होत सोबत तुझ्या....
बांध मला फुटलेच नाही....
पिऊन बघितलं आठवणींचं अत्तर...
तहान तरी मिटलीच नाही....
शोधलीही होती तुला मी..
पण व्यक्त होण्या जमलंच नाही....
डोळ्यांत बघून सांगणारच होतो..
पण डोळ्यांत तुझ्या दिसलोच नाही...
काय पुरावे मागशील आता.....
एक क्षणही न असा की झुरलो नाही....
शब्द शब्दांत कोरली तू माझ्या....
घायाळ न अशी, कविताच नाही...😔

