...वाट...
...वाट...
कधी नाही, कधीकधी, एकटिच पडलेली...
किनाऱ्यास भुलवून..सागराला भीडलेली..
सारे ओळखीचे तिला..पायी काटे रुतलेले..
एक एक घाव माझे....डोळी तिच्या साठलेले..
तीच झाडे, तीच पाने....कधीकाळी वाचलेली...
कोमेजून शांत फुले... कधीकाळ हासलेली...
बोबडीच आज सारी..सुकलेली पाने जरी..
कधिकाळी माझ्याशीच...भांडलेली होती बरी...
तिच्या हाती जेव्हा हात..सरींवर सरी साठ..
फसवून धरणारी... हीच होती बघ वाट..
आज ओसंडून सारी.. गेली ठसे रुतलेली....
मुकमुक पाण्याखाली..स्वप्न जशी मिटलेली...
वाट म्हणे ,एकटाच....वाटसरू तूच नाही....
किती हिशोबात माझ्या...कोरलेली बारामाही...
येताजाता मज आता...आडवते बघ वाट...
म्हणे वेड्या नको आता..पुन्हा आसवांचे पाट...

