One sided love....
One sided love....
नको नुसतेच भांबाळ, कारभार एकहाती....।
उरी असावे जीर्ण... घाव दोहींकडे कदाचित...।।
आंधळा जरी घावला... चालताना मध्य राती....।
नवलाई रातरीची तिथे... मांडावी जपून कदाचित...।।
हा सारखेच मी आता , तुज माझे म्हणणे नको...।
कैद स्वाभिमान मी माझा... आहे ठेवला कदाचित....।।
की वेचताना तुज मी.. किती बारकावे टिपून गेलो...।
तू ही चाणाक्ष हवीबरी ,वाचताना मलाही कदाचित...।
तुझ्या हसण्यातील मी ,छळ ओळखून आहे.।
तू विसरली वाटते आजकाल... तुज जाणतो किती कदाचित..।।
शाश्वत धरून न्याय तुझे....मूकपणे जरी मी झेलतो.....।
एक वनव्यास एकटा मी.... जणू भिडतोच कदाचित.....।।
मी तुझ्यात जो चंद्र... अन अंतरंगात काळोख भरीला...।
वेड म्हणतात ह्यास.... बहुदा विसरली कदाचित...।।
मानतो भास असतात काही...अन आभास उमटलेले थोडे....।
काळ म्हणतो एक वेळ.... पुसतो सारेकाही कदाचित...ll
