°अतुट_ नाती..°
°अतुट_ नाती..°
आज सोडताना हात...खूप रुसले गं डोळे...|
गळ्यावरी मिठी घेत....खूप रडले गं भोळे...||
मी स्तब्ध एकचित्त....मूक मूक गेली वेळ....|
दिसे अपुरे अपुरे....उरी मोडलेले खेळ....||
भिजू जाऊ दिले सारे....घेत पाझरती कड...|
खांद्यावरी पडणारी....माझ्या एक एक धाड...||
सरींवर सरी गेल्या.....किती बेमाफ वाहून.....|
लाल लाल बुंद डोळे....तुज जाताना पाहून....||
आज एकटं गोकुळ....दाही दिशा करी राधा....|
राधेश्याम नावाचीच....जुनी लागलेली बाधा...||
सावरले जरा मन.... आले भान ध्यानावर....|
उरलेल्या एकट्याची.....आज रास पानावर...||