तु_येशील...
तु_येशील...
लागलीच ठेच ,तव सांगत येशील....।।
हळवे घाव मज, दावत येशील....
हा नाकार आज ,मी, जपून ठेवीतो...
बघ डोळ्यात मजला,सांडत येशील....।।।।
लागलीच ठेच,तव सांगत येशील...
हळवे घाव मज,दावत येशील ।।
लाख भाळतील सारे,देखण्या आकृतीला...
हजार बघ ओळीने,धावत येतील...
पल्याड अश्वभिंतीच्या,पण बघशील जेव्हाही....
हे (कंस) सारे रंगीन,तू मोडुन येशील....
हळवे घाव मज,दावत येशील......
हा नाकार आज ,मी, जपून ठेवीतो...
बघ डोळ्यात मजला,सांडत येशील....।।।।
तुज चित्रांत साठविल,कुणी स्वप्नांत पाहिलं...
भुल घालण्यास सारे,टपून राहतीलं...
हे दंश मग जेव्हा,तुज बाधा करतील....
तव पाखडून शब्द माझे,तुला वेचत येशील...
हळवे घाव मज ,दावत येशील....
हा नाकार आज ,मी, जपून ठेवीतो...
बघ डोळ्यात मजला,सांडत येशील....।।।।

