STORYMIRROR

Ajinkya Guldagad

Abstract Romance

4  

Ajinkya Guldagad

Abstract Romance

सांग ना....

सांग ना....

1 min
290

एक एक ओळीत माझ्या...गोठलेलं रक्त बघ....

शाईत ह्या निळ्याशार...दिसतो का फक्त बघ....

रिच रिता केल्या,भावना झुंजून क्षमलेल्या...

ह्या भावनांना भावनांनी कधी, कुरवाळून तर बघ....

कविता नाहीच ह्या नुसत्या,ज्या अक्षरांत मांडल्या....

लिहिता लिहिता डोळ्यांतूनच बघ,किती वेळ सांडल्या...

ओसरत नाही कधीच अरे....क्षणभरही तुझे ढग....

शाईत ह्या निळ्याशार...दिसतो का फक्त बघ....

कधीतरी ह्या सर्वांच मिळून,पुस्तक अस करेल....

राजा राणी श्वास एक, नवा इतिहास मागे उरेल...

वाटत पुस्तक हे कधीतरी,तू ही आनंदाने घेशील....

हळू-हळू प्रत्तेक घाव, साठवत साठवत रहाशील....

पुरावे देतीलच कविता, तुझ्या माझ्यातील जिवंतपणाच्या....

काही सोबत जगलेल्या, तर काही निरव एकांतपणाच्या...

वाचता वाचता वाटत खूप, खोलवर हरवून जाशील...

कवितांमधली तू तुला आपोआप ओळखून घेशील....

सहाजिक तुझ्या नयनांतून मला, पाझरायच आजही नाही..

आजवर साठलेल्या भावनांतून...फुटून रिचायच नाही....

भिजलेल्या डोळ्यांच्या कडांना अत्ता, हात लावून बघ....

त्या थेंबातही तुला अजून....मीच दिसतो का फक्त बघ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract