STORYMIRROR

Ajinkya Guldagad

Romance Tragedy Inspirational

3  

Ajinkya Guldagad

Romance Tragedy Inspirational

वचन

वचन

1 min
214

मग ठरलंच आहे सर्व ...तर ते घडणारच....

मात्र दिलेल्या वचनांवर, तू-मी अडणारच....

लाख विसरून बघशील,गेलेल्या सांजवेळेला....

हा नीरव एकांत तुझा,तुलाही छळणारच...

उचकी जव लागेल तुझी,ठसका माझाही जाणारच...

डोळ्यांतून तुझ्या माझ्या....एक वेळी वाहणारच...

स्थान एक सांग मला...जे अनोळखी अजून राहिले...

ते घाव मुके मुके....बोलके होणारच....

स्वतंत्र जरी वाहिलीस आज, कधी सोबत पाझरलेलो...

प्रेमसागरांच्या संगमावर....एकरूप होणारच....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance