माझ्यात तू
माझ्यात तू
नको वचनांत वेढलेली...नको उगीच गुंतलेली..
एक स्वच्छंदी रमणारी.. माझ्यात तू हवी....
नको रोज पूजणारी ..नको काळजाला भीडणारी
मनी भळभळेल उरी अशी...एक ठेच तरी हवी.
नको उबदार कूस ...नको अंगाई कुठली...
मज शोधत येईल अशी....एक वाट तरी हवी....
नको नशिबात कोरलेली..नको हक्कांनी भारलेली..
तुटत्या ताऱ्यास मान्य....अशी भेट तरी हवी..
नको कलमांच्या सीमा....नको लेखणीत अटी...
ह्या कवितांना ओळखेल अशी... एक साक्ष तरी हवी...